श्री हिरोजी इंदुलकर

#सेवेचे_ठायी_तत्पर - #हिरोजी_इंदुलकर #श्री_हिरोजी_इंदुलकर" ( #रायगड_निर्माता ) स्थापत्य अभियंता "श्री हिरोजी इंदुलकर" (रायगड निर्माता) असा (अभियंता) Engineer जगात होणे नाही. आत्ताच्या कोणत्याही सिविल इंजिनिअर ला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते, की जो आपल्या उभारणीचा पुरावा देतो. आताही तो रायगड पाहायला भेटतो. असे फक्त शिवकाळात होऊ शकते, आणि त्या शिलालेख प्रमाणे आज ही रायगड पाहायला भेटतो. ◆जगदीश्वराच्या मंडपाबाहेर असलेला शिलालेख : ।। श्री गणपतयेनमः ।। ।। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनु ।। ।। ज्ञया श्रीमछत्रपते शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः ।। ।। शाके षण्नव बाणभुमिगणनादानंद संवत्सरे ज्योतिराज ।। ।। मुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेश सार्प्ये तिथौ ।। १ ।। ।। वापीकूपतडागराजिरू ।। ।। चिरं हर्म्येर्वनंवीथिको स्तंभैः कुंभिगृहैनरेंद्रसदनै ।। ।। र्मिहिते श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजीना निर्मितो ।। ।। यावच्चंद्र दिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।। अर्थ :- सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद सिंहासनाधीश्वर श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मधे...